breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पदी आमोद कुंभोजकर यांची नियुक्ती

पिंपरी – महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार अधिकारी आमोद आप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या सहसचिव शुभांगी शुभांगी सेठ यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांची 16 मे रोजी पुण्यात बदली झाली आहे. पुण्यात प्राथमिक शिक्षण संचालनालयात नव्याने स्थापन केलेल्या शालेय पोषण आहार विभागात उपसंचालकपदी (वित्त व लेखा) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अर्थ विभागाचे अवर सचिव मा.रा. गांधी यांनी बदलीचा आदेश पारित केला होता. त्यानंतर अद्याप पंधरा दिवसांपर्यंत या ठिकाणी अन्य कोणत्याही अधिखाऱ्याला नियुक्ती देण्यात आली नसल्याने, या पदाचा कार्यभार तळदेकर यांच्याकडेच होता.
मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर या पिंपरी-चिंचवड महापालिकेत जून 2014 मध्ये प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्या होत्या. पालिकेत त्यांना साडेतीन वर्ष पुर्ण झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. अखेर 16 मे रोजी त्यांची पुण्याच्या माध्यमिक शिक्षण विभागात बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी कुंभोजकर यांची वर्णी लागली आहे.