breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे बोगस ‘एफडीआर’ प्रकरण; स्थापत्यच्या 19 ठेकेदारांना नोटीस

सात दिवसात खुलासा मागविला, अजूनही बॅंकाकडून ‘एफडीआर’ची खातरजमा सुरु

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागातील आठही प्रभागात PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून पालिकेकडे दिलेले FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत. त्यातील 19 ठेकेदारांना स्थापत्य विभागाने नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला आहे. दरम्यान, महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्या ठेकेदारांवर ‘ब्लॅकलिस्ट’ कारवाई दाट शक्यता आहे.

महापालिकेच्या विविध विभागात विकास कामे ठेकेदार करीत असतात. ठेकेदारांच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली आहे. त्यात सर्वात कमी दराने निविदा भरणा-या ठेकेदारांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या विविध कामे घेताना त्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून पालिकेकडे दिलेले FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहे.

महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जल:निस्सारण, आरोग्य, पर्यावरणासह अन्य विभागात FDR प्रकरणी सखोल चाैकशी सुरु आहे. ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे निघाले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाकडून बॅंकाकडे एफडीआरची खातरजमा करण्यात येत आहे.

दरम्यान, स्थापत्य विभागातील आठही प्रभागात 19 ठेकेदारांचे PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळले आहे. त्या ठेकेदारांच्या प्रत्येक विभागातील फाईल्सची कसून चाैकशी सुरु आहे. त्या सर्वांना स्थापत्य विभागाने नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खुलासा असमाधानकारक वाटल्यास त्यांच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येणार आहे.

बॅंककडून होतोय वेळकाढू पणा….

महापालिकेच्या अनेक विभागात काम करणा-या ठेकेदारांना बनावट FDR तयार करून देणारी टोळी सक्रीय आहे. ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे की खरे याविषयी बॅंकाकडे प्रत्येक विभागानी पत्र पाठवून खातरजमा करण्यात येत आहे. मात्र, बॅंकाच्या वेळकाढू पणामुळे ठेकेदारांचे फावले असून एफडीआर तपासणीला वेळ लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button