महानगरपालिकेच्या चार विषय समिती सदस्यांची महासभेत निवड जाहीर
पिंपरी- महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीमध्ये नवीन नगरसेवकांची शुक्रवारी महासभेत निवड करण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे यांनी नगरसेवकांची विविध समितीच्या सदस्य पदाची निवड जाहीर केली. मध्ये महानगरपालिकेतील ताैलनिक पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आपआपल्या नगरसेवकांची नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिली. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून समितीमध्ये नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली.
विधी समिती:- माधुरी कुलकर्णी, मनीषा पवार, उषा ढोरे, राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे (भाजपा), सुमन पवळे, संगीता ताम्हाणे, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)
महिला व बाल कल्याण समिती:- हिराबाई घुले, आरती चोंधे, उषा मुढे, निर्मला कुटे, स्वीनल म्हेत्रे (भाजप), मंगला कदम, स्वाती काटे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस), मीनल यादव (शिवसेना)
क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती:- अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संजय नेवाळे, अश्विनी बोबडे (भाजप), अनुराधा गोफने, अपर्णा डोके, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे (शिवसेना)
शहर सुधारणा समिती:- सीमा चोघुले, माया बारणे, सुरेश भोईर, कमल घोलप, निर्मला गायकवाड (भाजप), वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, उषा वाघेरे (राष्ट्रवादी काँग्रेस), निलेश बारणे (शिवसेना) या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली.
महानगरपालिकेच्या विषय समिती सदस्य पदावर निवड झालेल्या नगरसेवकांचा सत्कार महापाैर नितीन काळजे, सभागृह नेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे करण्यात आला.