breaking-newsपुणे

मराठा समाजातील युवकांचे आर्थिक सक्षमीकरण – प्रवीण गायकवाड

अलिबाग : संभाजी ब्रिगेड समाजकारणासाठीच राजकारण करत असून मराठा समाजातील युवकांचे आर्थिक सक्षमीकरण ही ब्रिगेडची महत्वाची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार छत्रपती संभाजींराजे, आदित्य तटकरे, अनिकेत तटकरे, विनय माळी आदी उपस्थित होते. लोकशाहीत बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य असले तरी सोशल मीडिया जबाबदारीने वापर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. युवकांना रोजगार नाही. अर्थिक सक्षमीकरण हाच यावर उपाय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठा युवकांनी उद्योग क्षेत्रात जावे, परदेशातील उद्योगाचे वातावरण समजून घ्यावे, यासाठी संघटनेने युवकांचे परदेश दौरेदेखील घडवून आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे अहद्‌ ऑस्ट्रेलिया, तहद्‌ कॅनडा ‘अवघा मुलूख आपला’ ही भूमिका घेऊन युवकांनी घ्यावी असे ते म्हणाले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button