TOP Newsक्राईम न्यूजताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

मराठा जनआक्रोश आंदोलनास उत्स्फूर्त पाठींबा

विहामांडवासहीत मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांत  कडकडीत दोन दिवसांपासून 100 टक्के कडकडीत बंद

पैठण: पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे मराठा जनआक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून 100% बंदला प्रतिसाद मिळत आहे. सराटी आंतरवाली येथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यामुळे विहामांडवा-येथील संभाजी महाराज चौकामध्ये टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.

शहागड येथील जनआक्रोश आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अंतरवाली सराटी (ता.आंबड) येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि.१) मराठा समाजाच्यावतीने विहामांडवा बंद पुकारण्यात आला. या आवाहनाला येथील व्यापारी बांधवाने मोठा प्रतिसाद देऊन पूर्णपणे व्यवहार बंद ठेवले.

दोन दिवसांपूर्वी शहागड पैठण रोडवर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मराठा
समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विहामांडवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या बंदला विविध व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बीड, जालना विहामंडवा, अंबड, शहागड येथील लोकांनी काल घडलेल्या लाठीचार्ज घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्स्फूर्तपणे 100 टक्के कडकडीत बंद पाळला आले.

चोख पोलीस बंदोबस्त तैनात
बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि संतोष माने, विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवल, जमादार किशोर शिंदे, जमादार ताराचंद घडे, जमादार रामेश्वर तळपे,अंमलदार अभिजीत सोनवणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button