breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा क्रांती मोर्चा : कळंबोलीत मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांचा हवेत गोळीबार

मुंबई – राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले असून त्यास काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. तसेच, पालघर, रायगड येथेही उद्या बंद पुकारण्‍यात आला आहे. मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्‍या समन्‍वयकांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर, नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मुंबईत पार पडणाऱ्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचा या आंदोलनावर वॉच असणार आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचाली सायबर सेलच्या रडारवर असणार आहेत. तर, सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांकडून विभागातील बारीक हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, काही पोलीस साध्या वेशात या आंदोलनात सहभागी होत, सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत. शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षही अलर्टवर आहे. सोशल मीडियाच्या हालचालींवर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

या सेवा सुरू : शाळा, महाविद्यालये, रक्तपेढ्या, रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध टँकर, स्कूल बस, रेल्वे, मोनो, मेट्रो
या सेवा बंद : बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने, दुकाने, बाजारपेठा, उद्योग

 

 • चेंबूर नाका, चेंबूर स्टेशन आणि आसपासच्या परिसरात दुकानं बंद.
 • सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक व्यवस्थित सुरू , फ्री वे वर सुद्धा वाहतूक व्यवस्थित सुरू, दुकानदारांनी दुकानं मात्र ठेवली बंद
  नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग वाशी गाव रास्ता रोको
 • दादरमध्ये शिवसेना भवनकडे येणारा रस्ता मराठा आंदोलकांनी रोखला
 • नवी मुंबई – घणसोली रेल्वेस्थानकात रेलरोको
 • ठाणे लोकल रेल्वे स्थानकावरही आंदोलकांकडून रेलरोको करण्याचा प्रयत्न
 • भायखळा पूर्वेकडील घोडपदेव परिसरात कडकडीत बंद.
 • मराठा आंदोलकांच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा, जोगेश्वरीजवळ आंदोलकांकडून लोकल रोखण्याचा प्रयत्न.
 • घणसोली नवी मुंबई येथे पहाटे दोन बेस्ट बसवर (workman bus) दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंत बेस्टची बससेवा बंद आहे.
  मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बस सेवा ऐरोली पर्यंत चालविण्यात येत आहे.

  मुंबईत रिक्षा, टॅक्सी, लोकल, मेट्रो वाहतूक सुरुळीत सुरू.
 • मुंबई बंदला शिवसेनेचा पाठिंबा, पण बंदमध्ये सहभाग नाही.
 • मुंबईत नागरिकांना त्रास न होऊ देण्याचं शिवसेनेकडून आवाहन
  आजचा बंद शांतता मार्गाने पार पाडण्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून आवाहन.
 • ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात टीएमटी बसची तोडफोड, तीनहात नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी.
 • पनवेलमध्ये बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button