breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मराठा क्रांती मोर्चाकडून माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांचा निषेध

  • मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, पंढरपुर तहसिलसमोर आत्मक्लेश आंदोलन
  • मराठा समाजावरील केसेस कधी घेणार मागे? असा जाब विचारताच दिली धमकी

पंढरपुर – माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना 14 हजार मराठा समाजातील युवकांवरील केसेस कधी? माघारी घेणार असा जाब राम गायकवाड यांनी गुरसाळे (ता पंढरपुर) या सभेत विचारला. यावेळी भाजप कार्यकर्ते त्याच्या अंगावर धावून मारहाण केली. तसेच उमेदवार निंबाळकर यांनी ह्याला बाहेर काढा रे, हाकलून द्या, अशी भाषा वापरली. त्यामुळे संप्तत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रणजिंतसिंह निंबाळकर यांचा जाहीर निषेध नोंदविला आहे.

या घटनेचा सकल मराठा क्रांती मोर्चांकडून आक्रमक होवून रणजिंतसिंह निंबाळकर यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (रविवारी दि.२१ ) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आत्मक्‍लेश आंदोलन पंढरपूर तहसील कार्यालयासमोर  करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समन्वयक उपस्थित होते. समाजातील सर्व लोकांना जर कोणी धमकावत असेल तर त्यांना योग्य वेळी धडा शिकवण्याचा इशारा यावेळी सर्व समन्वयकांनी दिला.

भाजप-शिवसेना महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी १८ एप्रिल २०१९ रोजी गुरसाळे ( ता. पंढरपुर) येथे प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. ही सभा ऐकण्यासाठी आणि अडीअडचणी मांडण्यासाठी ग्रामस्थ सभेला उपस्थित होते. उमेदवार निंबाळकर जेंव्हा भाषण करू लागले तेंव्हा, मराठा आरक्षणासाठी १४ हजार मराठा युवकावर केसेस दाखल आहेंत, त्या केसेस केंव्हा माघारी घेणार ? याचे उत्तर द्या. असे मराठा समाजाचे समन्वयक राम गायकवाड यांनी प्रश्न विचारताच भाजपचे कार्यकर्ते अंगावर धावून आले. भर सभेतून बाहेर काढत, त्यांना मारहाण केली.

यावेळी स्वतः उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी ह्याला बाहेर काढा रे, ह्याला धरा व हाकलून द्या, अशी भाषा वापरली. त्याच्या या भाषेमुळे   कार्यकर्त्यांनी राम गायकवाड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चांकडून निषेध व्यक्त केला आहे. तसेच समाजाच्या मागण्यांसाठी आवाज उठवला तर याच शिवरायांच्या महाराष्ट्रात जीवे मारण्याची धमकी दिली जाते. हा कुठला न्याय आहे.  अजून निवडणूक चालू आहे, प्रचार सुरु आहे. तोपर्यंतच जर अशा प्रकारे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.  तर निवडून आल्यानंतर हे लोक काय करतील, याची कल्पनाच करवत नाही. हे लोक जर निवडून आले तर संपूर्ण मतदारसंघात दहशत निर्माण करतील. ह्यांना लोकशाही मान्य नाही. हे ठोकशाही मानणारे आहेत. ह्यांची दादागिरी जर संपवायची असेल आणि मराठा समाजातील मुलांवरील गुन्हे काढून घेण्यासाठी भाजप-शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या पंढरपूर विभागाच्या वतीने करण्यात आले.

समाजासाठी प्रश्न विचारणाऱ्या मराठा समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे माऊली पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button