breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात रेशनिंग दुकानाला आग; २० जणांचा मृत्यू

छिंदवाडा: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशनिंग दुकानाला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रॉकेलचं वितरण करत असताना ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.
हर्रई विभागातील बारगी गावात ही दुर्घटना घडली. सहकारी समिती केंद्रामध्ये रेशनिंग दुकान असून तिथे रॉकेल वितरण केलं जात असतानाच आगीचा भडका उडाला. सिगारेटची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रेशनिंग दुकानात धान्यही मोठ्या प्रमाणात होते. त्यात अरुंद जागेमुळे लोकांना बाहेर पडता आले नाही आणि ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असे सांगण्यात येत आहे.
आगीत २० पेक्षा अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याचेही स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून अद्यापि आकडेवारी देण्यात आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button