breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशमध्ये भाजपाला धक्का, विद्यमान आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे आमदार संजय शर्मा आणि माजी आमदार कमलापत आर्य यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती दिली. त्यामुळे राज्यात ऐन निवडणुकीवेळी भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे.

दुसरीकडे किरार समाजाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नातेवाईक गुलाबसिंह किरार हे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे सांगण्यात येते. प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर किरार पक्षात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. नंतर त्यांनी हे ट्विट हटवले. प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष शोभा ओझा यांनीही किरार यांनी राहुल यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याचे वृत्त फेटाळले.

नरसिंहपूर जिल्ह्यातील तेंदूखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शर्मा आणि दतिया जिल्ह्यातील भांडेरचे माजी आमदार आर्य यांनी भाजपाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे शर्मा आणि आर्य हे भाजपात सहभागी होण्यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. त्यानंतर दोघे भाजपात गेले आणि भाजपाच्या तिकिटावर आमदारही बनले. आता दोघेही आपल्या जुन्या पक्षात परत आले आहेत.

दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी अशा गोष्टींचा भाजपावर काही फरक पडणार नसल्याचा दावा केला आहे. आम्ही बहुमताने ही निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीपूर्वी पक्षांतर होणे या गोष्टी सामान्य असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button