breaking-newsआंतरराष्टीय

भ्रष्टाचारप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना ७ वर्षांचा कारावास

ढाकातील एका न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. झिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचाराशी निगडीत हे प्रकरण होते.

आठ वर्षांपूर्वी विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षांविरोधात भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) गुन्हा दाखल केला होता. एसीसीने खालिदा आणि इतर तिघांविरोधात झिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ३१.५४ मिलियन टकाचा (३,९७,४३५ डॉलर) घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

वर्ष २०१० मध्ये जुन्या ढाका जेल हाऊसजवळील न्यायालयात हा खटला सुरु झाला. दरम्यान, खालिदा झिया यांनी आजारपणाचे कारण पुढे करत न्यायालयात येणे टाळले होते. त्यानंतर न्यायमूर्तींकडून मुख्य आरोपीच्या अनुपस्थितीच या खटल्याची सुनावणी करावी लागली.

यापूर्वी झिया अनाथालय ट्रस्ट प्रकरणी ८ फेब्रुवारीला पाच वर्षांचा कारावास सुनावण्यात आला होता. या खटल्यात खालिदा झिया आणि त्यांचा मोठा मुलगा तारिक रहमानसमवेत पाच लोकांवर त्यांच्या २००१ ते २००६ दरम्यान बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी असताना २० मिलियन टकाचा (२,५३,१६४ डॉलर) भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button