breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरीच्या राजकारणातील ‘महायोद्धा’ महेश लांडगे यांचा विधानसभा रणसंग्रामचा ‘शंखनाद’

  • भाजपकडून अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब
  • अत्याधुनिक ‘वॉररुम’च्या कामकाजाचा केला मुहूर्त
  • भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांची उपस्थिती

पिंपरी (विशेष प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे सहयोगी सदस्य आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी निवडणूक रणसंग्रामचा ‘शंखनाद’ केला आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक ‘वॉररुम’चे उद्घाटन करण्यात आले. भोसरीच्या राजकारणातील ‘महायोद्धा’ असा उल्लेख आमदार लांडगे यांचा केला जातो.

विधानसभा निवडणुकीत लोकसभा प्रमाणे ‘महायुती’ झालीच, तर भोसरीची जागा शिवसेनेला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीचा ‘शब्द’ मिळाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार आमदार लांडगे यांनी सक्रियपणे केल्याचे बोलले जाते.

विशेष म्हणजे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत ‘वॉररुम’चे मंगळवारी अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युती झाली तरीसुद्धा भोसरी विधानसभा मतदार संघावर भाजपचा ‘क्लेम’ राहील. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच आमदार लांडगे विधानसभेच्या कामाला लागले आहेत, असे दिसते. त्यामुळे भाजप किंवा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांना ‘आमदारकी’ दृष्टीआड होताना पहावी लागणार? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

****

कोण असतील लांडगेंचे संभाव्य प्रतिस्पर्धी?

भोसरीच्या राजकीय पटलावर आमदार महेश लांडगे यांना कडवे आव्‍हान स्वीकारावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार विलास लांडे, विद्यमान विरोधी पक्षनेता दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच, शिवसेनेकडून माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट इच्छुक आहेत. तसेच, भाजपमधूनही विद्यमान सभागृहनेता एकनाथ पवार यांनी गतवेळी निवडणूक लढवली होती. विद्यमान स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी हेसुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा अंदाज राजकीय विश्लेशकांकडून लावला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button