breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीच्या चार रस्त्यासाठी 142 झाडांवर कु-हाड

– वृक्ष काढण्यास पालिका वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता 

– 40 झाडांचे होणार पुर्नरोपण

पिंपरी (विकास शिंदे) –  झाडे लावा – झाडे जगवा याएेवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने झाडे तोडा – झाडे काढा अशा नवा पायंडा पाडला आहे.  यामध्ये शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाच ते दहा वर्षांच्या जून्या 142 झाडांवर कु-हाड चालविली जाणार आहे. महापालिकेच्या  क क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भोसरीतील चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्या रस्त्यांच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारी झाडे काढण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने परवानगी दिली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयातंर्गत स्थापत्य विभागाने चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. यामध्ये प्रभाग क्र. 8 येथील गवळी माथा चाैक ते स्पाईनरोड गोडाऊन पर्यंतचा रस्ता, इंद्रायणीनगर चाैक एमआयडीसी रस्ता ते डायनामेक कंपनी पर्यंतचा रस्ता, इंद्रायणीनगर चाैक ते डिस्ट्रिक्ट सेंटर पर्यंत लांडेवाडी, टेल्कोरोड रस्ता, यशवंतनगर चाैक प्रतिक हाॅटेल ते स्पाईनरोडच्या दोन्ही ही बाजूचा रस्ता अशा प्रकारे चार रस्त्यांच्या कामांना स्थापत्य विभागाने मंजूरी देवून कामाचे आदेश टेकेदाराला दिले आहेत. परंतू, चारही रस्ता रुंदीकरणात पाच ते दहा वर्षांची जूनी झाडे अडथळा ठरु लागल्याने ती झाडे काढावी, असे पत्र स्थापत्य विभागाकडून उद्यान विभागाला दिले होते.

त्यानूसार उद्यान विभागाच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्याकडून त्या झाडांची पाहणी करण्यात आली. तो पाहणी अहवाल समितीच्या बैठकीत सादर करुन झाडे काढण्यास मान्यता देण्यात आली. त्यानूसार चार रस्त्यावरील तब्बल 142 झाडे काढली जाणार आहेत. तर 40 झाडांचे पुर्नरोपण केले जाणार आहे. यामध्ये सुबाबुळ, कडूनिम, बदाम, साग, सिसू, कॅंशिया, पेल्ट्रोफोरम, पिंपळ, गुलमोहर, निलगिरी, कांचन, आंबा, रेनट्री, फायकस, स्पॅंथोडिया, जांभूळ, अष्टेमिया, सुरु, बाॅंटल, ग्लिरीशिडीया, बुश, उंबर आदी झाडांचा समावेश आहे.

दरम्यान, महापालिका वृक्ष प्राधिकरणाच्या सुचनेनुसार एक वृक्ष काढल्यानंतर  त्या जागेवर अथवा त्यांच्या आसपास किमान 5 वृक्षांची लागवड 30 दिवसांच्या आत करावी, तसा अहवाल कार्यालयाकडे सादर करावा, याबाबत उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरोधात महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील तरतुदीनूसार कारवाई करण्यात येईल, असा आदेश वृक्षाधिका-याने दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button