भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस

बुलढाणा – साडेतीनशे वर्षाचपासूनची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज (८ मे) सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि सुपारी कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. यांनतर यंदाच्या वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारणच राहणार असून देशात स्थिर सरकार येण्याचा अंदाज भेंडवडच्या भविष्यवाणीतून वर्तविण्यात आले आहे. तसेच घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते, असेही भाकीत मांडण्यात आले.
पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली बुलडाण्यातील भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे.