breaking-newsपुणे

भूमिपुत्रांनी जपला तांबडया मातीचा वारसा

  • पंचनाथ उत्सवातील आखाडयात रंगल्या कुस्त्या

पिंपरी – काळेवाडीतील भुमिपुत्रांनी पंचनाथ उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) भरविलेल्या निकाली कुस्त्यांच्या मैदानात पैलवांना एक लाख रुपयांपेक्षाही जास्त रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.

रोख एक्कावन्न हजारांच्या इनामासाठी शेवटची कुस्ती कुंजीर तालमीचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. प्रमोद मांडेकर आणि सह्याद्री कुस्ती संकुलचा राष्ट्रीय पदक विजेता पै. संग्राम शिंदे यांच्यात 22 मिनिटांहुन जास्त वेळ झुंज झाली. हजारों कुस्ती शौकीनांचे डोळ्यांचे पारणे फेडणारी ही झुंज शेवटी बरोबरीत सुटली. समस्त गावकरी मंडळींच्या वतीने दोघांनाही विभागून रोख बक्षिस देण्यात आले. पवना नगर रोड भोईर मळा काळेवाडी, पिंपरी येथे झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात यावेळी तेजश्री सोनवणे, श्रेया कंधारे, अजय लांडगे, किशोर नखाते या नामांकित खेळाडूंचा देखील पंचनाथ उत्सव कमिटी आणि समस्त गावकरी मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला.

निकाल पुढील प्रमाणे
अक्षदा वाळुंजकर- सोनाली कोळी तसेच पै. विनोद शिंदे- पै. राहुल वाघमारे, पै. अभिषेक तुर्केवाडकर- पै. संकेत घाडगे; पै. ऋषिकेश बालवाडकर- पै. केतन खराडे; पै. प्रविण निबांळकर-पै. युवराज दांगट; पै. सुशांत फेंगसे-पै. निखील नलावडे; पै. समाधान दगडे-पै. निखिल उंद्रे; पै. सागर लोखंडे-पै. शाम केंद्रे; पै. शिवराज मदने-पै. विराज रानवडे; पै. विशाल वाळुंज-पै. रोहित कलापुरे; पै. सत्यम भोईर-पै. विशाल थोरवे; पै. वरुण कांचन-पै. शुभम जाधव; पै. तुषार पवार-पै. वैभव बारणे; पै. अविनाश माने-पै. रामदास दळवी; पै.अंजिक्य कुदळे-पै. महेश येळवंडे; पै. सनी केदारी-पै. सोनू यादव; पै. ओंकार जाधव-पै. विशाल सोंडकर; पै. धनराज बिचकुले-पै. गईनाथ शिर्के; पै. निरंजन बालवडकर-पै. गोविंद जाधव; पै. अंजिक्य माचुत्रे-पै. श्रेयस लाटकर; पै. किरण माने-पै. अर्जुन बानगुडे; पै. बाबू पिसाळ-पै. संकेत माने; पै. श्री जाधव-पै. शार्दुल गायकवाड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button