breaking-newsराष्ट्रिय

भीतीपोटी काँग्रेस मोदींना शिव्या देत आहे – प्रकाश जावडेकर

काँग्रेस घाबरली असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत आहे अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. जेव्हा आम्ही राजीव गांधी किंवा घोटाळ्यांसंबंधी चर्चा करतो तेव्हा काँग्रेसकडे देण्यासाठी कोणतंही उत्तर नाही. म्हणूनच ते शिव्या देत आहेत असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. असा टोला प्रकाश जावडेकर यांनी यावेळी लगावला.

यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसने आतापर्यंत ५२ शिव्या घातल्या असल्याचं सांगितल. ‘काँग्रेसने आतापर्यंत ५२ शिव्या घातल्या आहेत. अर्धशतक पूर्ण झालं आहे. उरलेल्या १० दिवसात अजून ५० देतील. कारण ते हताश आहेत, निराश आहेत, त्यांच्याकडे उत्तर नाही’, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

Embedded video

Chowkidar Prakash Javadekar

@PrakashJavdekar

उनको मालूम होना चाहिए कि जितना ज्यादा कीचड़ उछालोगे उतना ज्यादा कमल खिलेगा और वहीं देश में हो रहा है।

हमारे पास नेतृव, सुरक्षा और विकास ये तीन मुद्दे हैं और उनके पास केवल गाली है @BJP4India

157 people are talking about this

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘ विरोधकांना नरेंद्र मोदींमुळे पायाखालची जमीन सरकत आहे हे समजत आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत आणि शिव्या देत आहेत’. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा उल्लेख न करता सर्वोच्च न्यायालयाच्या नावे खोटं बोलल्याने सर्वोच्च न्यायालयातही माफी मागावी लागली असल्याचं सांगितलं.

‘खोटं बोलणं काँग्रेसची सवय आहे. पायाखालची जमीन सरकली असल्याचा हा पुरावा आहे. मोदींप्रती असलेला द्वेष यातून समोर येत आहे’, असं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी म्हटलं. रोज चिखल उडवणं काँग्रेसची सवय आहे. पण त्यांना माहिती असलं पाहिजे की जितका जास्त चिखल उडवाल तितकं जास्त कमळ फुलेल आणि देशात तेच होत आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button