क्रिडा

भारत विराटवर अवलंबून नाही: कपिल देव

नवी दिल्ली: विराट कोहली फॉर्मात नाही, याचे खूप दडपण का घ्यायचे? चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर आली आहे हे मान्य; पण भारतीय संघ फक्त विराटवर अवलंबून नाही, असे स्पष्ट अन् थेट मत नोंदवले आहे ते भारताचे वर्ल्डकप विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट अपयशी ठरला. ज्याचा फटका त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघालाही बसला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होतो आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कपिल यांना गुरुवारी प्रश्न आला. कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता, त्याचा फटका भारतीय संघाला बसेल, असे वाटते का? यावर कपिल म्हणाले, ‘तुम्ही सगळ्यांनी आयपीएलआधी पार पडलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची धरमशाला कसोटी पाहिली आहे का? सगळे म्हणत होते की कोहली खेळला नाही तर भारत हरेल. त्या सामन्यात कोहलीपेक्षा इतर संघसदस्य छान खेळले. ज्यामुळे आपण जिंकलो. कोहली खेळला नाही, तर भारत हरणार, असे म्हणताना आपण इतर खेळाडूंवर अन्याय करतो. त्यांना कमी लेखतो. भारत फक्त कोहलीवर अवलंबून नाही’.
संघातील प्रत्येक खेळाडूला समान नजरेने बघणारे कपिल विराट कोहलीचा महिमादेखील नमूद करतात. ‘विराट हा भारतीय संघाचा महत्त्वाचा मोहरा आहे. त्याच्यासारख्या बड्या खेळाडूला चांगलेच कळते की केव्हा कसे खेळावे…’ असे ५८ वर्षांचे कपिल सांगतात. या सगळ्यांना गप्पांना निमित्त ठरले तर कपिल यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण. दिल्ली मादाम तुसाँने कपिलच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button