breaking-newsराष्ट्रिय

भारत-चीनचे संबंध जगाला स्थिरता आणि शांती देतील : मोदी

किंगदाओ : भारत आणि चीन या दोन देशांमधील भक्कम आणि स्थिर संबंध जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा देतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील किंगदाहो येथे व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी आज चीनच्या किंगदाहो येथे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याबाबतच्या अनेक मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जिंनपिंग अत्यंत उत्साहात भेटले. यावेळी पंतप्रधानांनी वुहान येथील शी यांच्या अनौपचारिक भेटीचीही आवर्जून आठवण काढली. वुहान येथील अनौपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी भारत-चीन संबंध अधिक भक्कम करण्यावर भर दिला. त्यानंतर सहा महिन्यांनंतर या दोन नेत्याची पुन्हा एकदा भेट झाली. गेल्या वर्षी डोकलाम प्रकरणानंतर सीमेवर चांगला समन्वय व्हावा, तसेच द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत व्हावेत, उद्देशाने वुहान येथे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली होती.

आज झालेल्या भेटीदरम्यान भारत आणि चीनदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. या भेटीत वुहान येथे पार पडलेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांवरील अंमलबजावणीबाबत आढावा घेतला जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SCO संमेलनात दहशतवाद आणि कट्टरतावाद्यांविरोधी लढाईमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ठोस उपाय शोधले जाणार आहेत. तसेच सध्याच्या वैश्विक मुद्द्यांवरही विचार केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी SCO च्या वार्षिक बैठकीसाठी आज दुपारी किंगदाओत पोहोचले. मोदी आज SCO च्या इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या संमलेनातही सहभागी झाले. मोदींनी उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानला या संघटनेचे सदस्यत्व दिल्यानंतर भारतीय पंतप्रधान पहिल्यांदाच SCO संमेलनात सहभागी झाले आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button