भारत इस्रायली बनावटीची ‘स्पाईक’ मिसाईल खरेदी करणार

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची मारक क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी इस्रायली बनावटीची ‘स्पाईक’ ही रणगाडा भेदी क्षेपणास्त्र खरेदी केली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. डीआरडीओच्या मदतीने रणगाडाभेदी क्षेपणास्त्रs बनवली जात आहेत. तथापि यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे तातडीने ही खरेदी होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.
सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. तथापि त्याबाबतची माहिती देण्यास नकार दिला आहे.या मिसाईलमुळे पाकिस्तानच्या अरेरावी आणि दहशतवादी घुसवण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यास चांगली मदत होणार आहे. भारतीय लष्कराची या क्षेपणास्त्राबाबतची तातडीची गरज लक्षात घेऊन इस्रायलच्या राफेल ऍडव्हान्सड् डिफेन्स सिस्टिम कडून ही रणगाडाभेदी क्षेपणास्त्रs खरेदी केली जाणार आहेत.
राफेलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, या खरेदी व्यवहाराची चर्चा सुरु आहे. तथापि करारावर अद्याप स्वाक्षरी झालेल्या नाहीत. हा खरेदी व्यवहार 500 अब्ज डॉलर्सचा होता. तर याला जानेवारीत स्थागिती दिली होती. परंतु इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर पुन्हा या खरेदी प्रस्तावाला वेग आला आहे.