breaking-newsराष्ट्रिय
भारतीय सैनिकांपासून दूर राहा, काश्मिरी मुलींना हिज्बुल मुजाहिद्दीनची धमकी
श्रीनगर : ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने काश्मिरी मुलींना भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांपासून दूर राहा, अशी धमकी दिली आहे. भारतीय सैन्याकडून काश्मिरी मुलींचा हनीट्रॅप म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सैनिकांपासून लांब राबावे, असे मुजाहिद्दीनने म्हटले आहे.
हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाझ नायकू याने ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. या क्लिपमध्ये तो म्हणतो, भारतीय सैन्याने काश्मिरी मुलींचा हेर म्हणून वापर केल्यानंतर आता त्यांचा हनीट्रॅपसाठी वापर सुरु केला आहे. मुजाहिद्दीनविरोधात भारतीय सैन्याने ही खेळली खेळली असून भारतीय सैन्याकडून मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांना हिज्बुलविरोधात वापरले जात आहे, असा दावा त्याने केला आहे.