breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतीय लेडी उसेन बोल्ट! १०१ व्या वर्षी सुवर्ण

ऑकलँड: अवघे १०१ वयोमान. पण धावण्याची जिद्द तिच्या नसानसात भिनलीय. म्हणूनच तर या वयात भारताची महिला धावपटू मन कौर हिनं १०० मीटर स्पर्धा १ मिनिट १४ सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक जिंकलं! हे तिच्या करिअरमधलं १७ वं गोल्ड मेडल आहे!!
वर्ल्ड मास्टर्स गेम्स ही स्पर्धा न्यूझिलँडच्या ऑकलँड शहरात भरवण्यात आली होती. यात २५ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. १०० वर्षे आणि त्यापुढील वयोगटात मन कौर एकट्याच होत्या. ‘मी या स्पर्धेचा आनंद लुटला. मी खूप खूश आहे. मी सतत धावत राहणार आहे. थांबणार नाही. अजून फुलस्टॉप आलेला नाही,’ मन कौर यांच्या या भावनाच त्यांची धावण्याबद्दलची पॅशन व्यक्त करतात.
कौर यांनी आठ वर्षांपूर्वी ९३ व्या वर्षी अॅथलेटिक्समध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्यांचा मुलगा गुरुदेव सिंह यांनी कौर यांना इंटरनॅशनल मास्टर्स सर्किटशी जोडून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यापूर्वी त्यांना खेळाचा कोणताही अनुभव नव्हता. मेडिकली फिट असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कौर यांनी आपल्या मुलासोबत जगातल्या एक डझनाहून अधिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आपल्या पदकांची संख्या कौर यांना २० पर्यंत न्यायची आहे. यासाठी त्यांना ऑकलँडमध्ये २०० मीटर धावणे, दोन कि. ग्रॅ. गोळाफेक आणि ४०० ग्रॅ. भालाफेक स्पर्धेतही त्यांना सहभागी व्हायचे आहे!

 

न्यूझीलँडच्या मीडियाने तर कौर यांना डोक्यावर घेतले आहे. तिथे त्यांना ‘चंडीगढचे आश्चर्य’ म्हटले जात आहे. त्यांच्या मुलाने गुरुदेव सिंह यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की मन कौर या फिट राहण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देतात. त्या साधारणपणे दूध आणि ज्यूस पिणे पसंत करतात. ‘सर्वांसाठी खेळ हे वर्ल्ड मास्टर्स गेम्सचे उद्दिष्ट आहे. मन कौरसारख्या खेळाडूंमुळे ते साध्य होत आहे,’ असे वर्ल्ड मास्टर्स गेम्स २०१७ च्या आयोजन समितीच्या प्रमुख कार्यकारी जेन्नाह वुट्टेन म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button