breaking-newsराष्ट्रिय

भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरात आचारी बनून घुसला ‘ISI’ एजंट

लखनऊ : पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या एका आचाऱ्याला आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या एजंट असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. रमेश सिंह (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे. हेरगिरी करून मिळालेली गोपनीय माहिती तो पैशांच्या मोबदल्यात आयएसआयला पुरवायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रमेश सिंह मूळचा उत्तराखंडमधील पिथोरगडचा रहिवासी आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक, लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि उत्तराखंड पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला गराली गावातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीय संरक्षण विभागाशी संबंधित एका राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरात रमेशने मायक्रोफोनद्वारे हेरगिरी करून मिळालेली गोपनीय माहिती आयएसआयला पुरवली. दरम्यान, आरोपी रमेशला पिथोरगड न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लखनऊ येथे उलट तपासणीसाठी नेण्यात आलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रमेश सिंह गावात शेती करत होता. पाकिस्तानात स्वयंपाकी म्हणून नोकरी करण्याचा प्रस्ताव एका नातेवाईकानं त्याला दिला. पाकिस्तानात २०१५ पासून सप्टेंबर २०१७ पर्यंत तो एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होता. याच दरम्यान तो आयएसआयच्या संपर्कात आला. रमेशने आयएसआयला एक डायरी आणि काही गोपनीय दस्तावेजही दिले आहेत.

‘रमेशने आयएसआयसाठी एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरात हेरगिरी केली. तो २०१७ मध्ये भारतात परतला होता. येथे आल्यानंतर त्याने आठ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली. त्याने आयएसआयकडून किती पैसे घेतले, याची माहिती अजून मिळालेली नाही,’ अशी माहिती उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button