breaking-newsक्रिडा

भारतीय मुली बाद फेरीत

आशियाई बास्केटबॉल स्पर्धा

जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानावरील यजमान भारताने ७०व्या स्थानावरील गुआमचा १०७-४२ असा धुव्वा उडवून बेंगळूरु येथे सुरू असलेल्या आशियाई १८ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.

केवळ ८ खेळाडूंसह आलेल्या गुआमच्या संघातील एक खेळाडू सोमवारी जायबंदी झाल्याने त्यांना ७ खेळाडूंसह कोर्टवर उतरावे लागले आणि यातील चार खेळाडू तर केवळ १४ वर्षांचे  होते. उंचीने आणि अनुभवाने कमी असलेल्या गुआमने सुरुवातीपासूनच हार मानल्याने सामना पूर्णपणे एकतर्फी झाला आणि उपस्थितांची चांगलीच निराशा झाली.  कर्णधार पुष्पाने सुरुवातीपासूनच उपस्थिती लावून बचावात उत्कृष्ट कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

अ-विभागात कोरियाने अत्यंत चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा ६३-६२ तर जपानने चीनचा ९४-७९ असा पराभव करून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीनला बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळावे लागणार आहेत. ब-विभागात सीरियाने साखळीत अपराजित राहून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात सिंगापूरचा पराभव केल्यास भारतदेखील थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button