Mahaenews

भारताची विद्युतीकरण क्षेत्रात चमकदार कामगिरी ; वर्ल्ड बँकेनं दिली शाबासकी

Share On

वॉशिंग्टन : भारताने विद्युतीकरण क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. देशातील ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचली आहे, अशी शाबासकी जागतिक बँकेनं दिली आहे. जागतिक बँकेनं या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात २०१० ते २०१६ या कालावधीत भारतानं दरवर्षी ३ कोटी लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचवली आहे.

भारतात ८५ टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचली आहे. हा आकडा भारत सरकारनं केलेल्या दाव्यापेक्षा अधिक आहे. सरकार अजूनही ८० टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचल्याचा दावा करत आहे. ही आश्चर्याची बाब आहे, असं जागतिक बँकेच्या व्हिव्हियन फोस्टर यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version