भाजप-शिवसेना देशाला लागलेली कीड – नितीन नांदगावकर

- मोदी व शहा मुक्त भारत करण्याचा मनसेचा निर्धार
- देश आर्थिक संकट सापडल्याने बेरोजगारी वाढली
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मागील पाच वर्षांत भाजप-शिवसेनेने विकास कामे न केल्याने यंदा महायुतीच्या नेत्यांना विकासावर बोलायला दातखिळी बसली आहे. त्यामुळे मोदींनी जनतेला मते मागण्यासाठी शहीद जवानांचा मुद्दा करुन भाजप-शिवसेना राजकारण करु लागली आहे. म्हणून भाजप-शिवसेना ही देशाला लागलेली कीड असून ही कीड काढण्याची आपल्यावर आली आहे, असे मत मनसेचे नितीन नांदगावकर यांनी व्यक्त केले.
वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये मावळ व शिरुरच्या मनसे पदाधिका-यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मनसेचे बाबु वागस्कर, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, रुपेश माहळस्कर, दिपक हुलावळे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर,-बाळा दांनवले, राजु साळवे, अंकुश तापकिर, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, सिमा बेलापुरकर , दत्ता देवतरासे, संजय यादव ,मयुर चिंचवडे, शाम जगताप , विशाल मानकरी, राहुल जाधव ,अनिता पांचाळ,संगिता देशमुख, स्नेहल बांगर, रुपाली गिलबिले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 500 हून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.
नांदगावकर म्हणाले की, भारत देश नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुक्त करु या, देशाला वाचवू या, असा नारा राज ठाकरे यांनी दिला आहे. अन्याय, अत्याचार करणा-या विरोधात पेटून उठा, आता ख-याअर्थाने देशात जागता पाहारा देण्याची वेळ आली आहे, कारण, चाैकीदार चोर आहे. या चाैकीदारामुळे देशासह महाराष्ट्राची देखील अधोगती सुरु आहे. सध्या देश आर्थिक संकटात सापडला असून नोटाबंदी, जीएसटीमुळे चांगल्या बॅंका सुध्दा बंद पडू लागल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र वागस्कर, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या विरोधात मनसेचे पदाधिकारी मैदानात उतरुन मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत. दोन्ही लोकसभेत परिवर्तन करण्यासाठी मनसेने निर्धार मेळावा घेतला आहे.