भाजप-शिवसेना दलाल निघाली, आक्षरषः देश विकला यांनी – उदयनराजे भोसले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लोकांना विश्वासात घेऊन भाजप-शिवसेनेने नागरिकांचा केसाने गळा कापला. पाच वर्षात देशाचं नंदनवण करता आलं असता. परंतु, हे तर दलाल निघाले. पाच वर्षात यांनी आक्षरषः देश विकला आहे, अशा शब्दांत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता विरोधकांवर तोफ डागली.
मावळ लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड येथील निगडीत जाहीर सभा सुरू आहे. या सभेत भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार पार्थ पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नेते नाना काटे, संदीप पवार, स्थायीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह शेकाप, आरपीआय (कवाडे गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत.
भोसले म्हणाले की, लोकांनी विश्वास ठेवला ही लोकांची चूक झाली. तुम्ही लोकशाहिचे राजे आहेत. अनेक वर्षापूर्वी, व्यापा-यांचा हेतू घेऊन चिल्लर इंग्रजांची इस्ट इंडिया कंपनी भारतात आली. त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण गुलामगिरीत गेलो. त्यावर पुन्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा देश तुमचा आहे. जमिनी, डोंगर, कपारी यावर तुमची सत्ता आहे. त्यानंतर स्वराज्याची स्थापना झाली. ही छत्रपतींनी एकट्यांनी नाही केली. तुमच्या पूर्वजांच्या खंबीर साथीवर केली.
पुलवामा हल्ल्यात ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणाची आहुती दिली. त्याच देशाची पाच वर्षात वाईट अवस्था केली. कोणाचा तरी भाऊ, बाप या हल्ल्यात शहीद झाला. ही आवस्था देशाची पाच वर्षात भाजपने केली. मतदार राजाची आम्हाला जाणिव आहे. परंतु, भाजपला तुमची व्यक्तीगत किंमत नाही. त्यांना फक्त तुमचे मत हवे आहे. आम्ही म्हणतो तुमच्यामुळे आम्ही आहोत. भाजपवाले म्हणतात, सत्ता आल्यानंतर आमच्यामुळे तुम्ही आहात, हा फरक आमच्यात आणि त्यांच्यात आहे, असेही भोसले म्हणाले.
भाजपच्या मनात धन की बात होती
मन की बात, आहो यांच्या मनात असतं तर पाच वर्षात देशाचं नंदणवन केलं असतं. परंतु, ते मनात नव्हतं कुठून येणार मन की बात. त्यांचा आवाज निघत होता मन की बातचा परंतू त्याठिकाणी होत होती धन की बात. देशाची दिशा बदलायची असेल तर बहुमत लागते, बहुमतासाठी तुमची साथ हवी आहे, अशीही साद भोसले यांनी मतदारांना घातली.