breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजप महिला पदाधिका-याला अश्लिल व्हिडिआे पाठवून विनयभंग

भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

भोर-वेल्हा भाजप तालुकाध्यक्षाचा पराक्रम  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील एका भाजप महिला पदाधिका-याला भाजपच्याच भोर-वेल्हा तालुकाध्यक्षाने मोबाईलवर अश्लिल व्हिडिआे पाठवून विनयभंग केला आहे. ही घटना मागील दोन आठवड्यापासून घडली आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. 

याबाबत पिंपरी-चिंचवडमधील 40 वर्षीय भाजप महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाजप भोर-वेल्हा तालुका अध्यक्ष आनंद देशमाने याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद देशमाने हा वेल्हा तालुक्याचे भजपचे तालुका अध्यक्ष आहे. पीडित महिला पदाधिकारीसोबत आरोपीची मागील तीन वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी देशमाने याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. दोन आठवड्यापासून आनंद देशमाने हा महिलेच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवत होता. महिलेने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार येणाऱ्या मेसेजला कंटाळलेल्या महिलेने रविवारी (फी. 28) रात्री प्रतिसाद दिला असता आरोपीने त्यांना अश्लील व्हिडिओ पाठवला. यावरून भाजप महिला पदाधिकारी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button