Mahaenews

भाजप नेत्याच्या सांगण्यावरून दाखल केली खोटी तक्रार

Share On

भोपाळ : मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार हेमंत कटारे यांच्याविरोधातील बलात्काराच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. भाजपा नेते अरविंद भदोरिया यांच्या सांगण्यावरुनच मी हेमंत कटारेंविरोधात बलात्काराची तक्रार केली, असे प्रतिज्ञापत्रच बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने न्यायालयात सादर केले आहे.

मध्य प्रदेशमधील भदोरिया मतदार संघातील पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी अरविंद भदोरिया यांचा काँग्रेसचे उमेदवार हेमंत कटारे यांनी पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी हेमंत कटारे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता.

दरम्यान, कटाले यांनी एका तरुणीविरोधात खंडणी आणि ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्या तरुणीने कटाले यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. यानंतर पोलिसांनी कटालेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

 

Exit mobile version