breaking-newsराष्ट्रिय
भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल- शरद पवार

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आवडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. देशात झालेल्या लोकसभेच्या १० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत भाजपाला ९ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
पवार म्हणाले, विरोधकांनी सामान्य नागरिकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात तसेच भाजपा सरकारविरोधात एकत्र यायला हवे. दरम्यान, सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जे भाजपाविरोधात आहेत, ज्यांचा लोकशाही आणि समान हक्कांवर विश्वास आहे त्यांनी गांभीर्याने एकत्र येण्याबाबत विचार करायला हवा असेही पवार यांनी म्हटले आहे.