भाजपाला सत्तेचा माज आला आहे – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात नसली तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेला चांगलेच जेरीस आणले आहे. दररोज प्रत्येक सभांमधून राज ठाकरे सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून आज राज ठाकरे नवीन काय पोलखोल करणार ? याची सर्वसामान्यांमध्ये उत्सुक्ता असते.
त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाषणाचाही एक नवीन ट्रेंड आणला आहे. जो जनतेला प्रचंड भावला आहे. दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातली तफावत ते दाखवून देत आहेत.
– रस्ते खणून ठेवलेत आणि म्हणतात ‘राज साहेब आगे बढो’ कुठून पुढे जाऊ.
– भाजपवाले माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.
– खोट बोलण्याचा रोग अख्ख्या पक्षाला झाला आहे.
– मोदी मुमकीन हैं जाहीरातीतील कुटुंबाला आज पुन्हा स्टेजवर आणून त्यांची ओळख करुन दिली.
– गरीबी हाटओच्या जाहीरातील ते कुटुंब प्रत्यक्षात सुखवस्तू घरातील आहेत.
– साध्वी प्रज्ञा यांना तिकीट का दिले?
– साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे अमित शाह समर्थन करत आहेत.
– मोदींनी जेवढया योजना सांगितल्या त्याच्या जाहीरातींवर ४५०० ते ५५०० कोटी रुपये खर्च झाला.