breaking-newsमुंबई

भाजपाला धूत मनसेची दिवाळी पहाट

नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. या दिवशी अभ्यंगस्नानाची प्रथा आहे. याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. भाजपकुमार थापाडे असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राज ठाकरे नेहेमीच करतात. आता व्यंगचित्राच्या माध्यमातूनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

अभ्यंगस्नान असा मथळा देऊन एक व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या प्रथेप्रमाणे अंघोळीच्या आधी तेल लावून घेत आहेत असे दाखवण्यात आले आहे. त्याचवेळी एक कार्यकर्ता येऊन त्यांच्या कानात विचारतो साहेब अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का? दुसरीकडे खिडकीत लोकांची गर्दी जमलेली दाखवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम थापा मारत असतात असा आरोप राज ठाकरे कायमच करतात आणि त्याचमुळे संतप्त झालेली महाराष्ट्राची जनता त्यांचा दिवाळीच्या दिवशी म्हणजेच अभ्यंगस्नान करताना समचार घ्यायला आली आहे असे हे व्यंगचित्र आहे. राज ठाकरेंचे बोलणे जेवढे तिखट आहेत तसेच त्यांच्या कुंचल्याचे फटकारेही आहेत. या व्यंगचित्राच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. आता या टीकेला मुख्यमंत्री उत्तर देणार की दुर्लक्ष करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दिवाळी निमित्त राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांची मालिकाच फेसबुक आणि ट्विटरवर आणली जाणार आहे. दिवाळीचे पुढचे सगळे दिवस राज ठाकरेंच्या कुंचल्यातून काय काय समोर येते आणि ते राजकीय व्यवस्थेवर कसे प्रहार करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button