breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा कुटुंबीयांवर भाजपचा दबाव?

पालघर : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी भाजप सोडू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. वनगा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपची नाचक्की झाली असून ते भाजपमध्ये परतावे, यासाठी मुख्यमंत्र्यांचा आटापिटा सुरू आहे.
वनगा कुटुंबीयांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांची फौजच त्यांच्या घरी धाडली. यामध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार मनिषा चौधरी, आमदार पास्कल धनारे, माजी आमदार जगन्नाथ पाटील, ओमप्रकाश शर्मा यांचा समावेश होता. ही सारी मंडळी दीड तास वनगा यांच्या घरी तळ ठोकून बसली होती. त्यांनी घरात असलेल्या वनगा कुटुंबीयांचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न केले. असे करूनही काही वनगा कुटुंबीय स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहिले. त्याचवेळी श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने अज्ञातस्थळी हलविले आहे.
‘वनगांच्या मृत्यूनंतर भाजपने वाऱ्यावर सोडले’

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. अशा दु:खाच्या परिस्थितीत भाजपमधील एका तरी नेत्याने भेट घेणे अपेक्षित होते, मात्र भाजपने कुटुंबीयांकडे पाठ फिरवली. अडीअडचणींसाठी स्वत: संपर्क साधूनही कुणीही फिरकले नाही, अशी खंत या कुटुंबाने व्यक्त करीत भाजपला रामराम ठोकला. ‘वडील भाजपचे खासदार राहिले असले तरी आमच्या कुटुंबाचे शिवसेनेशी जिव्हाळ्याचे नाते आहे. आमच्या घरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो आहे. त्यामुळे शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि न्याय मिळेल’, असा विश्वास श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button