breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपची ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशी भूमिका – विशाल वाकडकर 

मुख्यमंत्री, पालकमंत्र्याचा जाहिर निषेध…
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रश्न मार्गी लागले असल्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी चिंचवडच्या कार्यक्रमात जाहीर केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, आमदार आणि स्थानिक पदाधिका-यांसमोर शेकडो नागरीकांना ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशी भूमिका घेवून फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजपचे पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे जाहिर निषेध व्यक्त करतो, असे शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड मनपाच्या मागील सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाने शहरातील नागरीकांना ढिगभर आश्वासनांचे गाजर दाखवून सत्ता मिळविली. मनपामध्ये, राज्यामध्ये व केंद्रामध्येही भाजपाचीच सत्ता असतानाही एकही आश्वासन भाजपाने पुर्ण केले नाही. उलट भर कार्यक्रमात पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी देखील आणखी आश्वासनांचे गाजर शहरातील नागरीकांच्या माथी मारले.
पवना धरणापासून बंद पाईपलाईनव्दारे शहराला पाणी पुरवठा करणे, प्रकल्प बांधितांना साडेबारा टक्के जमीन परतावा देणे, शास्तीकराचा प्रश्न, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, बोपखेल मधिल नागरीकांना दळणवळणासाठी पूल उभारणी, पिंपळे गुरव मधिल नागरीकांसाठी संरक्षण खात्याच्या हद्दीत असणा-या रस्त्यांचा प्रश्न, राष्ट्रवादीच्या काळात विकसित केलेल्या झोपडपट्टी पुर्नवर्सन प्रकल्पातील लाभधारकांना घरांचे वाटप केलेले नाही.
बीआरटी प्रकल्प कार्यान्वित करणे, रिंग रोड बाधितांचा प्रश्न, मेट्रोचे विस्तारीकरण, शहरातील फुटपाथ वर वाढलेले टप-यांचे अतिक्रमण, शहर टॅंकर मुक्त करुन चोविसतास पाणी पुरवठा, नद्यांचे प्रदुषण कमी करुन जलपर्यटन केंद्र उभारणे, सुरक्षेसाठी शहरभर सीसीटीव्हीचे जाळे उभारणे, शहर वायफाय करणे, रस्त्यांचे नियोजन करुन चौक सिग्नल फ्रि करणे, सुनियोजित पार्किंग व्यवस्था करणे, शहरात शासकीय कार्यालय व उपकार्यालय सुरु करणे, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर करुन त्यातून वीजनिर्मिती करणे, सर्वांसाठी उत्तम आरोग्य सुविधा व तीन लाखांपर्यंत आरोग्य विमा काढणे, इस्त्राईलच्या धर्तीवर शाळा उभारणे यापैकी कोणते आश्वासन भाजपाने पुर्ण केले. याचे उत्तर शहरातील नागरीकांना मिळाले पाहिजे. तेच तेच भुलथापा देणारे आश्वासन ऐकूण नागरिक आता कंटाळले आहे. आगामी निवडणूकीत मतदार भाजपाच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. याची जाणीव झाल्यामुळेच पालकमंत्री व मुख्यमंत्री गोबेल्स नितीचा वापर करीत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button