Mahaenews

भाजपचा माजी उपमहापौर छिंदमला हद्दपार करा; नगरमध्ये विराट मोर्चा

Share On

अहमदनगर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला राज्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी आज शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. महिला, मुलांसह मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी छिंदमच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

श्रीपाद छिंदम याला १५ दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. २ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत छिंदमला तडीपार केल्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी काढला. मात्र, छिंदमला जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातूनच हद्दपार करा, अशी शिवप्रेमींची मागणी आहे.

Exit mobile version