Mahaenews

भांडूपमध्ये शौचालय कोसळून २ ठार

Share On

मुंबई: भांडूपच्या शिवाजी तलावजवळील साईसदन चाळीत सार्वजनिक शौचालय खचून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी दोन जण अडकल्याची भीती असून अग्निशमन दलाकडून शोध मोहीम सुरू आहे.

आज पहाटे साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली. भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं सार्वजनिक शौचालय खचलं आणि या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला. ज्या ठिकाणी हे शौचालय होतं तिथे मोठा खड्डा पडला आहे. ढिगाऱ्याखाली २ महिला आणि २ पुरुष अडकल्याने अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाने मदतकार्यास सुरुवात करून दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि पुरुषाचा समावेश असून बाबूलाल देवाशी, लाबूबेन जेठवा अशी त्यांची नावं आहेत. इतर दोन जणांचा अजूनही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, एनडीआरएफचं एक पथक आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Exit mobile version