breaking-newsपुणेमहाराष्ट्र
भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

पुणे – भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बालाजी गायकवाड (20, रा. दत्तवाडी) हा त्याचा मित्र चेतन भालेरावसह दांडेकर पुल चौकात उभा होता. यावेळी त्यांची आरोपींबरोबर भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन चौकात आले. यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करून पाठीत बॅटने तसेच कोयत्याने वारे केले. फिर्यादीच्या डोक्यावर, डावे व उजव्या हाताच्या पोटरीवर मारहाणीत गंभीर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. आर. अभंग तपास करत आहेत.