breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भर सभेत हार्दिक पटेल यांच्या कानशीलात लगावली

गुजरातमधील काँग्रसचे नेते  हार्दिक पटेल यांना जाहीर सभेमध्ये एका व्यक्तीने कानशीलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेंद्रनगर मतदारसंघातील बढवान येथे पटेल यांच्या सभेमध्ये हा प्रकार घडला. भाषण देण्यासाठी पटेल मंचावर उभे राहून आपले म्हणणे मांडत असतानाच एका व्यक्तीने तिथे येऊन त्यांच्या कानशीलात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळ पटेल गोंधळले. मंचावरील इतरांनी त्या इसमाला पडले.

एएनआयने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये हार्दिक पटेल गुजरातीमधून स्थानिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. पटेल यांचे भाषण सुरु असताना अचानक एक व्यक्ती त्यांच्या उजव्या गालावर जोरदार फटका मारत त्यांच्यावर ओरडते. अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळलेले पटेल बाजूला झाले. मंचावरील इतरांनी या व्यक्तीला पकडून कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या प्रकरानंतर पुढे बोलताना हार्दिक यांनी ‘भाजपावाले मला ठार मारु इच्छितात. हेच लोक माझ्यावर हल्ले करत आहेत. पण मी गप्प बसणार नाही’, असं मत व्यक्त केलं आहे.

ANI

@ANI

Congress leader Hardik Patel slapped during a rally in Surendranagar,Gujarat

2,447 people are talking about this

पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेत त्याची हार्दिक समर्थकांपासून सुटका केली. मारहाण करण्यात आलेल्या या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे.

काल दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये भाजपाच्या प्रवक्त्यांवर एका व्यक्तीने चप्पल भिरकावली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज पटेल यांच्यावर हा हल्ला झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button