breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भक्ती-शक्ती चाैकात भाजप सरकारचा निषेध ; विरोधकांनी उभारली गाजराची तोरणे

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवडकरांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध शहरातील विविध राजकीय पक्षांनी केला. भक्ती शक्ती चौकात गाजराची तोरणे उभारून सरकारचा निषेध केला. शिवसेना, नागरी हक्क कृती समिती, मनसे अशा विविध पक्षांनी निदर्शने केली.

पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न न सटल्यामुळे भक्ती-शक्ती चौकात शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संस्थांच्यावतीने निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर आणि मनसेचे गटनेते सचिन चिखले यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असतानाही उर्वरित कार्यकर्त्यांनी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आंदोलन केले. गाजराचे तोरण बांधले होते. यामध्ये शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राहूल कलाटे म्हणाले की, ‘‘  विधानसभा आणि महापालिका निवडणूकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांना अनेकदा जीआर दाखविले. परंतू, ते प्रश्न सुटलेला नाहीत. तसेच शंभर दिवसात बांधकामे नियमित करू, असे आश्वासन दिले. त्याचे काहीच झाले नाही. संपुर्ण शास्ती कर माफी देऊ, असे आश्वासनही हवेत विरले. त्यांना नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button