breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
भंडारा-गोंदियात ४९ बुथवर फेरमतदान सुरू

मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर मतदान सुरू झाले आहे. मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीमुळे याठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. तत्पूर्वी, मतदान यंत्रांमध्ये कुठेच बिघाड झालेला नाही त्यामुळे कुठेही फेरमतदान होणार नाही, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली होती. नंतर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. आज सकाळी सात वाजता या ठिकाणी मतदानास सुरूवात झाली.
दरम्यान, कैरानामधील ७३, गोंदिया-भंडारामधील ४९, तसेच नागालँडमधील एका बुथवर फेरमतदान होईल, असा आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पालघरमधूनही अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र, तेथे कोणत्याही बुथवर फेरमतदान होणार नाही.