breaking-newsराष्ट्रिय

ब्रिटनबरोबर समझोता करारावर सही करण्यास मोदींचा नकार

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनबरोबर एका समझोता करारावर सही करण्यास साफ नकार दिल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये अवैध रीतीने राहत असलेल्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याबाबतचा हा करार आहे. ब्रिटन भारतीयाना सहजतेने व्हिसा देत नसल्याने पंतप्रधानांनी समझोता करारावर सही करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे.

जानेवारी 2018 मध्ये केंद्रीय गृह राज्य मंत्री किरण रिजीजू यांनी या संबंधात द्विपक्षीय कराराची सुरुवात केली होती. मात्र त्याबाबत ब्रिटनकडून काहीही प्रगती न झाली नाही. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी या करारावर सही करणास नकार दिला. ब्रिटनमध्ये अवैध रीतीने राहणाऱ्या भारतीयांच्या मायदेशी परतण्याच्या प्रक्रियेत गती आली, तर ब्रिटन व्हिसा देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करील असे ब्रिटनच्या पंतप्रधान यांनी नोव्हेंबर 2017 मधील भारतीय दौऱ्यात सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button