breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बोपखेल पुल मार्गी लागणार ; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश

 लष्कराकडून जागा देण्याबाबत महानगरपालिकेला पत्र
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा  देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या  पाठपुराव्याला यश आले आहे. संरक्षण खात्याने या जागेची २५, ८१, ५१, २०० रुपये इतकी किंमत सांगितली असून या जागेच्या बदल्यात संरक्षण विभागाच्या जागेलगत पर्यायी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, असे पत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना पाठविले. त्या संदर्भात महानगरपालिका पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने २०१५ मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा. यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूरकरण्यासाठी मुळा नदीवर बोपखेलते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला. मात्र, तो तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटरचा वेढा पडतो आहे.
बोपखेलमधून पुढे खडकीत ५१२ येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळानदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणाऱ्याया रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल रखडला होता. तो प्रश्न आता मार्गी लागला आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने जागा द्यावी. यासाठी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते. तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरूण जेटली आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दाखविली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना ४ एप्रिल २०१८ रोजी संरक्षण खात्याचे रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांनी पत्र पाठविले आहे.
या पत्राव्दारे संरक्षण खात्याने महानगपालिकेने मागणी केलेल्या आवश्यक  जागेची किंमत संरक्षण खात्याच्या नियमानुससार २५, ८१, ५१, २०० रुपये इतकी होते, मात्र ही रक्कम कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महानगरपालिकेने संरक्षण खात्याच्या  जागेलगतचा जागा संरक्षण विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे पत्रात नमू केले आहे. संरक्षण खात्याच्या  या पत्रामुळे बोपखेलचा हा प्रश्न तडीस गेला आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून बोपखेलकरांची त्रासापासून मुक्तता होणार आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्तरावर चर्चा करून तातडीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button