breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बोगस आयकार्डवर प्रशासनाचा ‘वॅाच’

– अधिकारी व कर्मचा-यांना देणार नवीन आयकार्ड
पिंपरी : महापालिका आस्थापनेवर काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांना ओळख पत्र देण्यात येते. परंतू, महापालिकेत ठेकेदारी पध्दतीने काम करणा-या अनेकांकडे बोगस ओळखपत्र आढळून येवू लागले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचा-याने नवीन ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात नव्याने घोरण आखले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दैनंदिन कामकाजासाठी शहरातील दररोज हजारो नागरिक ये-जा करित असतात. त्या नागरिकांना महापालिकेचे अधिकारी व कर्मचा-यांचे नांव, पद, विभागाची माहिती व्हावी, नागरिकांना तत्काळ संबंधितांची ओळख होवून त्यांचे काम तातडीने व्हावे, याशिवाय सदरील अधिकारी, कर्मचारी हे महापालिकेचे आहेत, त्यांना समजावे, याकरिता सर्वांना विशिष्ट संकेतिक चिन्ह असलेले ओळखपत्र आस्थापनेवरील वर्ग एक ते चार पर्यंतच्या सुमारे सहा ते सात हजार अधिकारी व कर्मचा-यांना दिले गेले आहे.
दरम्यान, महापालिकेत ठेकेदारी पध्दतीने कामकाज करणा-या अनेक कामगारांकडे महापालिकेचे ओळखपत्र आढळून येवू लागले आहे. हे आयकार्ड बोगस असल्याचे प्रशासनाच्या निर्दशान आले आहे. त्यामूळे महापालिका प्रशासन विभागाने तातडीने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांनी नवीन ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता ओळखपत्र मागणीसाठी भांडार विभागाकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरच सर्व अधिकारी व कर्मचा-यांना नवीन ओळखपत्र मिळणार आहे. परंतू, यापुढे महापालिका प्रशासन विभागाकडून ओळखपत्र देण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांना शिफारस पत्र देणार आहे. संबंधितांना शिफारस दिल्याशिवाय ओळखपत्र दिले जाणार नाही. तसेच बोगस ओळखपत्र आढळणा-यावर प्रशासन विभाग तातडीने कारवाई करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button