बेंगळुरू मधील लॉकरमधून 14 कोटीची संपत्ती आणि 500 कोटीचे दस्तावेज जप्त

बंगऴूर (कर्नाटक) – येथील एका बॅडमिंटन क्लबच्या लॉकर्समधून 14 कोटींचा ऐवज आणि सुमारे 500 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. 14 कोटीच्या संपत्तीत 7.9 कोटी रुपयांचे हिरे आणि 3.7 कोटी रुपयांच्या परदेशी चलनासह 5.7 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. ही सारी मालमत्ता अविनाश अमरलाल कुकरेजा नावाच्या व्यापाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे.
मूळचा राजस्थानचा असलेला अविनाश अमरलाल कुकरेजा 1993 साली या क्लबचा सदस्य बनला होता. बिल्डर कंपनीचा भागीदार आणि सावकारी करणारा अविनाश अनेकदा निरोप देऊनही येत नसल्याने मॅनेजमेंटने लॉकर्स उघडण्याचा निर्णय घेतला. अशा मालकांचा पत्ता नसलेल्या लॉकर्सची संख्या शंभरावर आहे. 69, 71 आणि 78क्रमांकाचे लॉकर्स अविनाश अनधिकृतपणे वापरत होता. त्या लॉकर्समध्ये वेगवेगळ्या रूपात
क्लब मॅनेजमेंटने याबाबतची माहिती डीसीपी (सेंट्रल) चंद्रगुप्त यांना दिली. कबॉन ठाण्याचे इन्स्पेक्टर अजय रेड्डी यांनी यांनी सामानाची तपासणी केली. त्यात तीन बॅगा होत्या आणि त्यातील सारे सामान आय कर विभागाने सील करून ठेवले आहे.