breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बुलेट ट्रेनविरोधात शिवसेना आक्रमक; 70 गावात संघर्षयात्रा काढणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनविरोधात आता शिवसेना आणखी आक्रमक झाली. यासंदर्भात शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती दिली आहे.

विधान भवन, लोकसभा यांच्याइतकीच ग्रामसभा महत्त्वाची आहे. ग्रामसभेने बुलेट ट्रेन नको असल्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत, आता हे प्रस्ताव दिल्ली आणि पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्या 70 गावांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे, त्याच गावांमधून आपण संघर्ष यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुलेट ट्रेनविरोधाची दिशा ठरवण्यासाठी पालघऱमध्ये आज बैठक बोलावण्यात आली होती. ज्यात गोऱ्हेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button