breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

बिटकॉईनने बारा हजार कोटींचा शासनाचा कर बुडविला

पिंपरी : बिटकॉईन हे चलन नसून स्वतंत्र पैसे पाठविण्याची यंत्रणा आहे, त्यातून वीस ते पंचवीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाला आहे, फसवणूक झाली आहे. या कंपनीने बारा हजार कोटींचा शासनाचा कर बुडविला आहे. त्याविरोधात सरकारने कारवाई सुरू केली आहे, असे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या निमित्ताने साबळे यांनी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.

साबळे म्हणाले, ‘‘बिटकॉईनद्वारे होणा-या आर्थिक फसवणूकीसंदर्भात तसेच काळा बाजारासंदर्भात राज्यसभेत आवाज उठविला होता. त्यानंतर एसआयटी आणि सेबीकडे तपास दिला आहे. बिटकॉईन ही एक जागतिक क्रिप्टओ चलन आहे. पण काही भारतीय लोकांनी आरबीआय कायदा झुगारून स्वतचे वॉलेट चलन आणि ब्लॉकचेनद्वारे सामान्यांना पाच ते दहा टक्के असे महिन्याला कमविण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली. यातील लोकांनी भरपूर पैसा कमविली परंतु मालमत्ता लाभ कर भरला नाही. सरकारचा बारा हजार कोटींचा कर चुकविला आहे. पैशांचा काळाबाजार करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच गुन्हे दाखल करावेत.’’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button