breaking-newsमनोरंजन
‘बिग बॉस’च्या घरात कोणती जोडी पटकावणार ‘फ्रेश फेस’ टायटल

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक नवीन टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये बिग बॉस घरातील महिला सदस्यांना आनंदित व्हायची संधी देणार आहेत. या टास्कअंतर्गत एका जोडीला ‘फ्रेश फेस’ हे टायटल मिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे.
या टास्कमध्ये सदस्यांची तीन जोड्यांमध्ये विभागणी करण्यात केली आहे. जी जोडी सगळ्यात कमी वेळामध्ये हा टास्क पूर्ण करेल ती या टास्कमध्ये विजयी ठरेल. तेव्हा हा टास्क नेमका कसा रंगणार? कोणत्या जोडीला फ्रेश फेस हे टायटल मिळणार? कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच बिग बॉसच्या घरात मिळणार आहेत.