breaking-newsमनोरंजन
बिग बॉसच्या घरातून जुई गडकरी बाहेर

रविवारचा दिवस म्हणजे बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. दर आठवड्याला घरातील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. या आठवड्यात जुई गडकरी घरातून बाहेर पडली. सुशांत, सई, जुई आणि आस्ताद हे चौघे नॉमिनेट झाले होते. त्या चौघांपैकी अखेर जुईला घराबाहेर जावं लागलं.
जुई घराबाहेर पडल्याचं दु:ख सगळ्यांनाच झालं. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, भूषण खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच घरातून बाहेर पडल्यानंतर जुईला एक विशेष अधिकार देण्यात आला आणि तो म्हणजे जुई कोणच्याही एका सदस्याला पुढच्या एका आठवड्यासाठी शिक्षा देऊ शकते मग ती कुठलीही शिक्षा असेल त्या सदस्याला ती पूर्ण करणं भाग असेल. हिच संधी साधत जुईनं सईला पुढील एक आठवडा कॉफी न पिण्याची शिक्षा दिली.