पुणे

बालभारतीची सातवीची पुस्तके नव्या ढंगात

  • शिक्षकाच्या एकांकिकेचा पहिल्यांदाच समावेश
  •  आकार बदलला; सर्व पुस्तके मोठ्या आकारात
  • शाळेतच पुस्तके मिळण्याचे यंदा शेवटचे वर्ष

पुणे – राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची (बालभारती) यंदाच्या वर्षी सातवीची नव्याने येणारी पुस्तके येत्या आठवडाभरात बाजारात दाखल होणार आहेत. माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली. यंदाच्या वर्षी येणारी ही नवी पुस्तके यामध्ये जास्तीत जास्त आकर्षक व चित्रांचा वापर करत तयार करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच यामध्ये शिक्षकाने लिहिलेल्या एकांकिकेचाही समावेश असणार आहे.

इयत्ता सातवी व नववीची नव्याने येणारी ही पुस्तके नव्या अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित असून यामध्ये मागील वर्षाच्या पुस्तकाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. “क्‍यू आर कोड’ सहत या पुस्तकांमध्ये अनेक संकेतस्थळांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. तसेच आकर्षक मांडणी, संवादांच्या स्वरुपात धड्यांची मांडणी करण्यात आली आहे. याबाबत डॉ. मगर म्हणाले, यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तके मिळण्याचे हे शेवटचे वर्ष असणार असून पुढील वर्षीपासून या पुस्तकांसाठीचे पैसे विद्यार्थ्यांना खात्यात “डायरेक्‍ट बेनिफिट’ अंतर्गत दिले जातील. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्याशी जोडण्याचे काम युध्दपताळीवर सुरू असून याचा दुसरा टप्पा सुुरू झाला असल्याचेही मगर यांनी सांगितले.

याबाबत बालभारती अभ्यास मंडळाच्या विद्यासचिव म्हणाल्या, यंदाच्या वर्षी राज्यातील शिक्षकांकडून एकांकिका मागविण्यात आल्या होत्या. त्यातील एका शिक्षकाची एकांकिका ही पाठ्यपुस्तकासाठी निवडण्यात आली असून त्याचा सातवीच्या पुस्तकात समावेश आहे. मागील वर्षीपासूनच पुस्तके ऍक्‍टीव्हिटी बेस करण्यात आली असून यंदाही ही सर्व पुस्तके अक्‍टीव्हीटी बेस असणार आहेत. तसेच आतापर्यंत जी पुस्तके छोट्या आकारात होती ती सर्व पुस्तके आता विद्यार्थ्यांना मोठ्या आकारात मिळणार आहेत.

सातवीची पुस्तके तयार असून या आठवडाभरात बाजारात उपलब्धही होतील. तर त्यापोठापाठ नववीचेही नवीन पुस्तक उपलब्ध होईल. या पुस्तकांमध्ये कोणकोणते नवीन धडे घेतले आहेत हे पुस्तक बाजारात आल्यावर दिसेलच. मात्र या पुस्तकांची मांडणी आकर्षक व आकार नेहमीपेक्षा मोठा असल्याने ती विद्यार्थ्यांकडून त्याचे स्वागतच होईल.

– डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button