breaking-newsपुणेमहाराष्ट्र
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

- दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये बारावीच्या निकालाबाबत तारखा फिरत होत्या. मात्र आता अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा निकाल निकाल बुधवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
www.mahresult.nic.in