breaking-newsराष्ट्रिय
बाबा रामदेव सिमकार्ड लाँच करत असल्याचं ‘ते’ वृत्त खोटं

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी बीएसएनएलसोबत हातमिळवणी करत आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत असल्याचं वृत्त सोमवारी प्रसिद्ध झालं होतं. पतंजली सिमकार्ड लाँच करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत नसून पतंजलीने बीएसएनएलसोबत फक्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करार केला आहे.
पतंजलीने यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून, बीएसएनएल पंतजलीच्या कर्मचाऱ्यांना १४४ रुपयांचा प्लान देणार आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल, एसटीडी, रोमिंग तसंच दिवसाला २जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. हा प्लॅन फक्त पतंजलीच्या कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित आहे. पतंजलीने प्रसिद्धीपत्रक जारी करत कंपनी टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश करत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे.