ताज्या घडामोडीपुणे

बांधकाम मजुरांनी नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

  • कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांचे आवाहन

पिंपरी – इमारत व इतर बांधकाम मजुरांसाठी शासनाने विषेश नोंदणी अभियान सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बांधकाम मजुरांनी विषेश अभियानात सर्वांची नोंदणी करून सरकारच्या वतीने मिळणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांनी केले.

कष्टकरी कामगार पंचायत आणि घरकाम महिलासभेच्या वतीने पिंपरी येथील भक्ती शक्ती सभागृहात नोंदणीकृत बांधकाम मजुरांना ओळ्खपत्र वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते . यावेळी घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, सरकारी कामगार अधिकारी एम. जे . मुजावर, कामगार निरिक्षक डी. बी . कोळी , मुख्या लिपिक ज्योती पाटील , कष्टकरी कामगार पंचायत संघटक गौतम सरवदे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब वाघ म्हणाले की, बांधकाम साईटवर अपघातात मुत्यु झाल्यास, त्यांच्या वारसदारांना पाच लाख रुपये आणि पत्नीला पाच वर्षे पंचवीस हजार रुपये मिळतील. अपघातात गंभीर जखमी झाल्यास दोन लाख रुपये मुलाच्या शिक्षणासाठी वार्षिक दहा हजार रुपये, अवजार खरेदीसाठी पाच हजार रुपये, घर बांधणीसाठी दोन लाख रुपये, अशाप्रकारे 28 योजनांचा लाभ बांधकाम मजुरांना मिळणार आहे. यासाठी त्याची नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केल्याशिवाय हे लाभ मिळणार नाहीत.

एम. जे. मुजावर यांनी अवजारे खरेदी साठी मिळणारे पाच हजार रुपये या बाबत फॉर्म कसे भरायचे, ईतर विविध लाभ मिळण्यासाठी कोणकोणते फॉर्म भरायचे आणि त्या साठी लागणारे कागदपत्र याबाबत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button